चैत्यभूमीच्या गेटवर होळीचा पेटवण्याचा प्रयत्न, एका तरुणीने रोखली होळी

राज्यभरात गुरूवारी होळी मोठ्या प्रमाणात साजरी झाली. होळीचे दहन करण्याचा प्रथा गेली अनेक वर्ष सुरू आहे. पण यावेळी चैत्यभूमीच्या गेटवर होळी पेटवण्याचा प्रकार समोर आला. यावरुन सोशल मीडियावर जोरदार वादही पेटला. जयाताई अंकुश बनसोडे या तरुणीने इथे ठिय्या दिला आणि ही होळी पेटवण्यास विरोध केला. त्यानंतर इथली होळी रद्द करण्यात आली.;

Update: 2022-03-18 14:43 GMT

राज्यभरात गुरूवारी होळी मोठ्या प्रमाणात साजरी झाली. होळीचे दहन करण्याचा प्रथा गेली अनेक वर्ष सुरू आहे. पण यावेळी चैत्यभूमीच्या गेटवर होळी पेटवण्याचा प्रकार समोर आला. यावरुन सोशल मीडियावर जोरदार वादही पेटला. जयाताई अंकुश बनसोडे या तरुणीने इथे ठिय्या दिला आणि ही होळी पेटवण्यास विरोध केला. त्यानंतर इथली होळी रद्द करण्यात आली.

हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आपला संताप व्यक्त केला. सिद्धार्थ जगदेव या ट्विट वापरकर्त्यांनी "चैत्यभूमी जवळ जर होळी पेटवलीच तर त्यात मनुस्मृती च्या प्रती जाळाव्या स्थानिक भीमसैनिकांनी, त्याशिवाय हे सुधारणार नाहीत" अशी भूमिका मांडली.

लंडनमधील डॉ. संग्राम पाटील यांनीही यासंदर्भात ट्विट केले आहे, " होलिका माता को जिंदा जला दिया था, और कब तक जलाओगे? एकट्या मुलीने चैत्यभूमी च्या गेटवर हाेळी पेटवण्यास विरोध करून, होळी पेटवू दिली नाही." असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. इतक्या वर्षात पहिल्यांदाच चैत्यभूमीच्या गेटसमोर असा प्रकार झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\


Tags:    

Similar News