शेतकरी पुत्राने पटकावला यूपीएससीत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक

जालना जिल्ह्यातील आनंदगाव मधील एका शेतकरी मुलाने अत्यंत बिकट परिस्थितीवर मात करत नुकत्यात झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ऑल इंडीया रँक 102 ने तर महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. डिस्ट्रीक्ट मायनिंग ऑफिसर असं पद त्याला मिळणार आहे. कोव्हीड काळात झालेल्या भावाच्या निधनानंतर घरची जबाबदारी सांभाळत अजिंक्य शिंदे याने यूपीएससीमध्ये शिखर गाठले.;

Update: 2024-01-15 12:41 GMT

जालना जिल्ह्यातील आनंदगाव मधील एका शेतकरी मुलाने अत्यंत बिकट परिस्थितीवर मात करत नुकत्यात झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ऑल इंडीया रँक 102 ने तर महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. डिस्ट्रीक्ट मायनिंग ऑफिसर असं पद त्याला मिळणार आहे. कोव्हीड काळात झालेल्या भावाच्या निधनानंतर घरची जबाबदारी सांभाळत अजिंक्य शिंदे याने यूपीएससीमध्ये शिखर गाठले.




 

अजिंक्य यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झालं असून उच्च माध्यमिक शिक्षण हे परभणी शहरात झालं. ज्ञानतीर्थ विद्यालयातील नितीन लोहट या शिक्षकाच्या मार्गदर्शनामूळे केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेचं खूळ त्याच्या डोक्यात बसलं. योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीच्या बळावर अवघ्या दोनच वर्षांमध्ये सदरील परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. त्यानंतर पदवीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्याने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात बी.एससी. ला एॅडमिशन घेतलं. दरम्यानच्या काळात आलेल्या कोरोनामध्ये त्याच्या मोठ्या बंधुचे निळकंठ शिंदे यांचं निधन झालं तेव्हा तो पूर्णपणे खचून गेला होता मात्र पुन्हा नव्याने उभारी घेत स्वतःला सावरुन त्याने कुटूंबाचा भार सांभाळत पूणे येथे यूपीएससीचा अभ्यास सुरुच ठेवला आणि अखेर त्याला यशप्राप्ती मिळाली. त्याच्या या यशाबद्दल आई वडील आणि इतर नातेवाइक यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच्या या यशाचं वेगवेगळ्या स्थरावरून कौतुक होत आहे.




 


Tags:    

Similar News