आधीच दर पडल्याने शेतकऱ्यांची बेजारी.. त्यात महावितरणची वसुलीची मुजोरी..
दर पडल्यानं शेतकरी बेजार... महावितरणची वसुली जोरात.. स्वाभिमानीचा इशारा
एकीकडे संपुर्ण महाराष्ट्रातील शेतकरी फळे व भाजीपाला यांचे दर गडगडल्याने शेतकरी अडचणीत आहे.. शेतकरी आपला शेतीमाल अक्षरश रस्त्यावर ओतून देत आहे.. प्रचंड तोटा सहन करणार्या शेतकऱ्यांना आता महावितरणच्या पठाणी वसुलीचा तगादा सहन करावा लागत आहे.. राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हैराण आहे.. पिके करपु लागल्याने शेतकरी हवालदिल असताना महावितरणने राज्यात विज कनेक्शन तोडण्याचा धडाका उठवला आहे..एकीकडे पिके करपली असताना महावितरणकडुन संपुर्ण महाराष्ट्रातील डिपी सोडवले जात आहेत.. ही पठाणी वसुली बंद करण्यात यावी अन्यथा "महावितरणच्या कार्यालयात टोमॅटो ओतून लाल चिखल करू, व विज कनेक्शन तोडण्यास येणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना मिरचीचा धुर देवु" असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी दिला आहे..
येणाऱ्या काळात महावितरणकडून ही मुजोरी न थांबल्यास आदरणीय राजु शेट्टी साहेबांच्या नेतृत्वात राज्यभरामध्ये शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून महावितरण व सरकारच्या मुजोरीचा बंदोबस्त करेल असेही बागल यावेळी बोलताना म्हणाले..