Elon Musk : मस्कने उडवलं ट्वीटरचं पाखरु

एलॉन मस्क यांनी ट्वीटर डील पुर्ण होताच केलेल्या ट्वीटची जोरदार चर्चा रंगली आहे.;

Update: 2022-10-28 06:23 GMT

Elon Musk TwitterTakeover : टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी ट्वीटर डील पुर्ण होताच एक ट्वीट केलं आहे. त्यामुळे जोरदार चर्चा रंगली आहे.

एलॉन मस्क यांनी ट्वीटर डील पुर्ण होताच सीईओ पराग अग्रवाल (Parag Agrawal ) आणि महत्वाच्या पदावरील व्यक्तींना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर ट्वीट करून द बर्ड इज फ्रीड (The bird is Freed) असं म्हटलं आहे.

एलॉन मस्क यांनी ट्वीटर डील (Twitter deal ) स्थगित करतांना फेक अकाऊंट आणि स्पॅमचा आरोप केला होता. मात्र त्यानंतर आता डील पुर्ण झाल्याने मस्क यांनी ट्वीटरचं पाखरू मुक्त झाल्याचे म्हटले आहे.

13 एप्रिल रोजी एलॉन मस्क (Elon musk twitter takeover) यांनी ट्वीटर खरेदी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी 54.2 डॉलर प्रति शेअर्स या दराने 44 बिलीयन डॉलरची ऑफर दिली होती. मात्र फेक अकाऊंट आणि स्पॅमचे (Fake account and spam) कारण देत मस्क यांनी ट्वीटर डील स्थगीत केली होती. त्यानंतर ट्वीटरने मस्क यांनी डीलला स्थगिती दिल्यानंतर कोर्टात धाव घेतली. यानंतर ऑक्टोबरमध्ये मस्क यांनी पुन्हा ट्वीटर डील करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार मस्क यांनी ट्वीटरचा ताबा घेतला. त्यानंतर ट्वीटरमध्ये मोठे बदल होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यापार्श्वभुमीवर मस्क यांनी ट्वीटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

ट्वीटरचे सीईओ (Twitter CEO) पराग अग्रवाल, ट्वीटरचे सीएफओ (Twitter CFO) नेड सेगल (Ned segal) आणि लीगल अफेअर पॉलिसी हेड विजया गाड्डे (Vijaya gadde) यांना डील पुर्ण होताच बाहेरचा रस्ता दाखवला आहे. याबरोबरच आगामी काळात ट्वीटरमधील 75 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची शक्यता एका मीडिया रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आली आहे.

Tags:    

Similar News