युक्रेनच्या मदतीसाठी धावला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Update: 2022-02-27 12:38 GMT

Photo courtesy : social media

सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे. युक्रेन रशियाच्या हल्ल्याचा सामना करत आहे.नाटोतील अनेक देश युक्रेनला पाठिंबा जाहिर करत आहे. आता युक्रेनच्या मदतीसाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क पुढे आला आहे.

हवाई हल्ले आणि बॉम्बस्फोटांमुळे देशातील अत्यावश्यक सेवांवर परिणाम होत आहे.त्यात इंटरनेट सेवेवर ही परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत युक्रेनचे पहिले उपपंतप्रधान मायखायलो फेडोरोव्ह यांनी ट्विटरच्या माध्यमातून एलॉन मस्क यांच्यारकडे मदत मागितली होती. त्यानंतर एलॉन मस्क युक्रेनला सॅटेलाइट इंटरनेट सेवा देण्याचे मान्या केले आहे.

एलॉन मस्क यांचीही स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सेवेची कंपनी आहे. रशियाकडुन हल्ले होत असलेल्या युक्रेनमध्ये सायबर हल्लेही होत आहेत. देशातील इंटरनेट सेवांवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे व्हॉईस पंतप्रधान आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्री मायखाइलो फेडोरोव्ह यांनी इलॉन मस्क यांना ट्विटर पोस्टद्वारे मदतीचे आवाहन केले.

फेडोरोव्ह यांनी ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे , "मस्क, तुमचे रॉकेट अवकाशातून पृथ्वीवर यशस्वीपणे उतरत असताना, रशियन रॉकेट युक्रेनच्या सामान्य नागरिकांवर हल्ले करत आहेत. आम्ही तुम्हाला स्टारलिंक स्टेशन उपलब्ध करून देण्याची विनंती करतो जेणेकरून आम्हाला रशियाच्या हल्ल्याचा सामना करता येईल."

एलन मस्क यांनी याबाबत तात्काळ निर्णय घेतला आणि युक्रेनला मदत करण्याचा निर्णय घेतला. स्टारलिंकची इंटरनेट सेवा आता युक्रेनमध्ये कार्यान्वित झाली आहे. लवकरच आणखी बरेच टर्मिनल सक्रिय केले जात आहेत, त्यांनी मायखाइलो फेडोरोव्ह यांना उत्तर देताना मस्क यांनी लिहिले.

Tags:    

Similar News