Earthquake : पालघर हादरले

पालघर जिल्ह्यात भुकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Update: 2022-11-23 03:55 GMT

पालघर (Palghar Earthquake) जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी भागात बुधवारी पहाटे भुकंपाचे धक्के बसले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या भुकंपाची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल इतकी होती. मात्र पहाटे झालेल्या या भुकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.

नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजीने (National centre for Sismology) दिलेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे 4 वाजून 4 मिनिटांनी नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेला 89 किलोमीटर अंतरावर 3.6 रिश्टर स्केल भुकंपाचे धक्के बसले. या भुकंपाचा केंद्रबिंदू जमीनीत 5 किलोमीटर अंतरावर होता.

यापुर्वीही 2018 पासून पालघर जिल्ह्यात भुकंपाचे सौम्य आणि मध्यम धक्के बसले आहेत. यात 3.5 रिश्टर स्केलपेक्षा जास्त तीव्रतेच्या भुकंपाचे धक्के बसण्याच्या घटना मोजक्या आहेत. मात्र आज झालेल्या 3.6 रिश्टर स्केल भुकंपाच्या धक्क्यामुळे पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी भागातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती.

या भुकंप प्रवण भागासाठी तज्ज्ञांनी अनेक उपाययोजना सुचवल्या आहेत. मात्र या भागात भुकंपाची तीव्रता कमी झाल्याचे दिसून आल्याने या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. 


Tags:    

Similar News