एका डॉक्टरची मोदींशी 'मन की बात' ; कोविड संकटात व्हिडिओ झाला व्हायरल..
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक रविवारी आकाशवाणीवरून देशाच्या जनतेशी 'मन की बात' करतात. दुस-या कोरोना सुनामी नंतर देशाच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले. राममंदिर, कुंभमेळा आणि विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत असताना मोदी नेमकं काय करायला हवं होतं? प्रत्येक जिल्ह्यात भाजपाचं पक्ष कार्यालय उभं करण्याऐवजी हॉस्पिटल उभं केलं असता तर काय झाला असतं?
दुसरी कोरोना लाट रोखता आली असती का? मोदींनी नोटाबंदी केली लोकांनी रांगा लावल्या. मोदींनी गेल्या वर्षी टाळेबंदी केली लोकांनी रांगा लावल्या. आता हॉस्पिटल, ऑसक्सिजन, व्हेंटिलेटर आणि स्मशानभूमीत नागरिकांना रांगा लावायला का लावत आहेत ? मोदी तज्ञांचे सल्ले का ऐकत नाहीत? ते खरंच विरोधकांना देशद्रोही ठरवतात का? मोदींनी आता पायउतार व्हावे का? मोदींनी नेमकं काय केलं पाहिजे? सगळ्या विषयावर मोदींशी 'मन की बात' केली आहे, डॉ. संग्राम पाटील यांनी..