धुलीवंदनाची अनोखी परंपरा...
धुलीवंदनाच्या दिवशी आपल्या राज्यात अनेक अनोख्या परंपरा पाहायला मिळतात. अशीच एक परंपरा बीड जिल्ह्यातील विडा गावात पाहायला मिळत आहे. गेल्या ९० वर्षापासून ही परंपरा टिकवण्याचे काम ग्रामस्थ करत आहेत. नक्की ही परंपरा काय हे वाचा मॅक्स महाराष्ट्रवर...
बीडच्या विडा गावातील निजाम काळात सुरू झालेली परंपरा आज तागायत कायम आहे. धुलीवंदनाच्या दिवशी गावात जावयाची गाढवावरून (donkey ) मिरवणूक काढली जाते. या अनोख्या परंपरेचे (Unique custom ) जतन आजही ग्रामस्थांनी केले आहे. ही परंपरा पाहायला गावाच्या बाहेरुन ग्रामस्थ इथे येत असतात. ही परंपरा अद्यापही टिकवून ठेवण्याचे काम ग्रामस्थांनी केली आहे.
Dhuliwandan innovative tradition in Maharashtraकेज तालुक्यातील विडा येथे धुलीवंदनाला जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली जाते. गेल्या ९० वर्षापासून ही परंपरा सुरूच आहे. जावई (son-in-law ) म्हटलं की, सासरकडील मंडळी इतर वेळी आपल्या जावयाच्या पुढे पुढे करताना पाहायला मिळतात. मात्र विड्यात ही आगळी वेगळी परंपरा आहे. यासाठी ग्रामस्थांना दरवर्षी जावयाचा (son-in-law) शोध घेण्यासाठी दमछाक होते. यावर्षी अविनाश करपे यांना हा मान मिळाला आहे. रात्री दीड वाजता त्यांना ग्रामस्थांनी शोधून गावात आणले आहे. तर आज त्यांची ही मिरवणूक मोठ्या थाटामाटात काढण्यात आली. मिरवणूक झाल्यानंतर गावातील हनुमान मंदिराच्या पारावर ग्रामस्थांकडून या जावयाला आहेर देण्यात आला. अशा अनोख्या पद्धती राज्यात पाहायला मिळतात. ही त्यातलीच एक पद्धत जी गेल्या ९० वर्षापासून जपली जातेय.