राज्यात कोरोनाचा कहर सुरूच; दिवसभरात १११ रूग्णांचा मृत्यू, ३५ हजार ९५२ करोनाबाधित रुग्ण वाढले
जागतिक महामारी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्रात रोज नवे उच्चांक गाठले जात असून आज दिवसभरात राज्यात १११ रूग्णांचा मृत्यू झाले तर ३५ हजार ९५२ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत.
राज्याच्या प्रमुख शहरांमध्ये झपाट्याने करुणा रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून हा एक प्रकारे कोरोना संसर्गाचा आता उद्रेक झाला आहे.
दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधित आढळून येत आहेतच, शिवाय मृत्यूंच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत असल्याचं दिसत आहे.
एका बाजूला विरोधी पक्ष नेत्यांच्या आरोपामुळे आघाडी सरकार अस्थिर असताना राज्य शासनासमोर करोना संसर्ग रोखण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे.
आज दिवसभरात राज्यात १११ रूग्णांचा मृत्यू झाला तर ३५ हजार ९५२ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत.ही गेल्या काही दिवसातील सर्व आकडेवारी असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.७ टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण २,६२,६८५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
आज २० हजार ४४४ रुग्ण देखील बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २२,८३,०३७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८७.७८ टक्के एवढे झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८८,७८,७५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २६,००,८३३ (१३.७८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १३,६२,८९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३,७७० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज नवीन 20,444 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 22,83,037 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 2,62,685 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 87.78 % झाले आहे.