गोडसेंनी गांधींचा वध केला, नाना पटोलेंचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य

गेल्या काही दिवसांपुर्वी नाना पटोलेंच्या वक्तव्याने वाद निर्माण झाल्यानंतर पुन्हा एकदा महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आयोजित कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.;

Update: 2022-01-31 07:25 GMT

मी मोदींना मारू शकतो, मी शिव्याही देऊ शकतो, असे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर पुन्हा एकदा महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमीत्त नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमीत्त आयोजित कार्यक्रमात बोलताना नाना पटोले म्हणाले की, महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य तर दिलेच पण त्याबरोबरच अहिंसेच्या माध्यमातून जगालाही संदेश दिला. तर या देशातील पहिला आतंकवादी नथुराम गोडसे यांच्या रुपाने पुढे आला आणि त्याने महात्मा गांधी यांचा वध केला, असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यावरून नाना पटोले टीकेचे धनी होत आहेत.

नथुराम गोडसे याने महात्मा गांधींची हत्या नाही तर वध केला असे विधान उजव्या विचारसरणीच्या संघटनांकडून केले जाते. तर महात्मा गांधी यांचा वध अशा शब्दप्रयोगाला काँग्रेसने कायमच आक्षेप घेतला आहे. मात्र नाना पटोलेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे.

यावरून नाना पटोलेंनी केलेल्या वक्तव्यावरून सारवा सारव करण्यासाठी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे धावून आले. तर अतुल लोंढे म्हणाले की, भाजपचे लोक दुतोंडी साप आहेत. कारण मोदींनी बेटी बचाव बेटी पटाव असे विधान केले तर ते स्लीप ऑफ टंग. मात्र नाना पटोले यांनी हत्याऐवजी वध म्हटले तर पटोलेंच्या मनातच ते होते, असे मत भाजपने व्यक्त केले. मग मोदींनी बेटी बचाओ बेटी पटोओ म्हटले तर त्यांच्याही मनात तेच होते का?, गुजरातमधील आरोप खरे होते का? असा सवाल अतुल लोंढे यांनी केला. तर पुढे बोलताना अतुल लोंढे म्हणाले की नाना पटोले एक नाही तर हजार वेळा म्हणतील गोडसे मुर्दाबाद. पण तसं भाजपच्या एकाही नेत्याने टीव्हीसमोर येऊन गोडसे हा महात्मा गांधींचा हत्यारा आहे. आतंकवादी आहे, असं चॅलेंज अतुल लोंढे यांनी केले.

Tags:    

Similar News