...तर चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार!

असं काय घ़डलं चंद्रकांत पाटील इतके संतापले?;

Update: 2020-11-03 02:07 GMT


कोथरुडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट करत भाजपने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली. चंद्रकांत पाटील या ठिकाणाहून विजयी देखील झाले. मात्र, त्यांच्यावर ते कोल्हापूर मधून पळून आले. अशी टीका सातत्याने केली जाते. यावर चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले...

जे मला म्हणतात ना कोल्हापूरमधून पळून आले. ते तिथे निवडून आले नसते. मात्र, मी आज मी एक चॅलेंज देतो की, कोल्हापूरमधील कोणत्याही विधानसभा मतदार संघातून आज एखाद्याने राजीनामा द्यावा आणि पोटनिवडणूक घ्यावी म्हणजे त्यांना समजेल, जर निवडून नाही आलो तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन. असं म्हणत विरोधकांना आव्हान दिलं आहे.

यावेळी त्यांनी आपण कोल्हापूरमधून निवडणूक लढण्यास तयार होतो. असं सांगितलं मात्र, अमित शहा यांनीच आपल्याला कोथरुडमधून निवडणूक लढण्यास सांगितलं. त्यामुळं आपण कोथरुडमधून निवडणूक लढलो. असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

आपको विधानसभा निवडणूक लढनीं पडेगी. अमितभाई माझा अजून विधान परिषदेचा एक महिना शिल्लक आहे. मला कुठे यात अडकून ठेवता? मी जर मोकळा राहीलो तर महाराष्ट्रभर फिरेन असं त्यांना सांगितले.

आपण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाचे जास्त जागा निवडून आणू, असे त्यांना सांगितले. मात्र, अमितभाईंनी आग्रह धरला तुला विधानसभा लढवायची असून आपको पुना मैं कोथरूडसे लढना है असंही सांगितलं. तसेच मी त्यानंतर माझ्या नावाची या मतदार संघातून घोषणा झाली आणि त्यानंतर आजवर माझ्यावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले.

मी कोल्हापुरातून पळून आलो. जातीचा विषय काढला. पण माझे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना आजही सांगणे आहे. मी कोल्हापूरमधील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास आजही तयार आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही आमदाराने राजीनामा द्यावा. मी तेथून निवडणूक लढवेल. मला हरणे माहीत नाही. निवडून नाही आलो तर हिमालयात निघून जाईल, अशा शब्दांत त्यांनी हसन मुश्रीफ यांना आव्हान दिलं आहे.

ते पुण्यात कोथरूडचे आमदार म्हणून वर्षभरात केलेल्या कामाच्या वर्षपूर्ती कार्यालय अहवालाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.

Tags:    

Similar News