पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बुलडाणा शिवसेना सरसावली ; मदत घेऊन लालपरी रवाना
बुलडाणा शिवसेनेच्या वतीने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एस.टी महामंडळाचे महा कार्गोच्या 13 बस रवाना करण्यात आल्या आहे.;
बुलडाणा : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बुलडाणा शिवसेनेने एस.टी महामंडळाचे महा कार्गोच्या 13 बस रवाना करण्यात आल्या आहे. बुलडाणा शिवसेना खासदार प्रतापराव जाधव, पंचायत राजचे अध्यक्ष आ. संजय रायमुलकर, आ.संजय गायकवाड आणि बुलडाणा शिवसेना प्रमुख जालिंधर बुधवत यांच्या उपस्थितीत मेहकर येथून बस रवाना केल्या आहेत.
पूरग्रस्तांसाठी 1400 क्विंटल अन्नधान्य, दैनंदिन गरजेच्या वस्तू पाठवण्यात आल्या आहेत. या मदत ताफ्यासोबत शिवसेना आमदार संजय गायकवाड हे देखील पूरग्रस्त भागाकडे रवाना झाले आहे. विशेष म्हणजे खासदार प्रतापराव जाधव यांच्या घरी लग्नसमारंभ असूनही त्यांनी प्रथम प्राधान्य मदतकार्यास दिले आहे. या मदतीमध्ये गव्हाचा पीठ , तांदूळ, डाळ , तेल आदींसह धान्य पाठवण्यात आले आहे. 80 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारण या दिवंगत बाळासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे आम्ही ही मदत पाठवत असल्याचे खा. जाधव यांनी म्हटलं आहे.