आज जनता दल यूनाइडेट (JDU) चे अध्यक्ष नितीश कुमार (Nitish Kumar) आज बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सातव्यांदा शपथ घेणार आहेत. मात्र, नितीश कुमार यांच्या शपथविधी पेक्षा त्यांच्या सोबत कोण शपथ घेणार या चर्चेला आता विधान आलं आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार JDU च्या वतीनं मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या शिवाय विजेंद्र यादव, अशोक चौधरी, शीला मंडल आणि मेवालाल चौधरी शपथ घेऊ शकतात. भाजप च्या वतीनं मंगल पांडेय, जीवेश मिश्रा, रामप्रीत पासवान, अमरेन्द्र प्रताप सिंह आणि रामसूरत राय शपथ घेणार आहेत.
साधारण पणे आज 15 मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि दोन उप मुख्यमंत्री यांच्यासह JDU आणि BJP चे प्रत्येकी पाच-पाच मंत्री शपथ घेणार आहेत.