शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेला अटल सेतु आज नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. खुला होताच फोटो काढण्यासाठी नागरिक गर्दी करत असल्याचे दिसून आले आहे, तसे व्हिडिओ देखील viral होताना दिसत आहेत. शनिवारपासून नागरिक गर्दी करत असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. नुकताच उद्घाटन झालेला अटल सेतु हा नागरिकांसाठी सेल्फी घेण्याचं ठिकाण बनत असून. २२ किलो मीटर लांब असलेल्या या देशातील सर्वात लांब सागरी सेतु नागरिकांसाठी आकर्षण केंद्र बनलं आहे.
अटल सागरी सेतूवर जाऊन भाजप नेते किरीट सोमय्यांनी देखील व्हिडिओ बनवण्याचा आनंद लुटलाय. तो व्हिडिओ त्यांनी ट्विट करून मोदी है तो मुमकिन है असे caption देखील दिले आहे. पण हे कितपत सुरक्षित आहे असा सवाल आता नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
हा अटल सेतू आजपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला झाला असून वाहनचालकांनी या सेतुवरून प्रवासाचा आनंद घेताना नियमांचे पालन करावे, वाहन वेग मर्यादा लक्षात घेऊन सुरक्षितपणे प्रवास करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केले आहे. प्रवास करताना आपल्या सगळ्यांसाठी हा एक अभिमानाचा क्षण असणार आहे, हा क्षण अनुभवताना आपण सर्वांनी सुरक्षित आणि आनंददायी प्रवास करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.