' अर्णब' चा पाय आणखी गोत्यात

आक्रस्ताळ्या पत्रकारितेचे प्रदर्शन करत सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याऐवजी विरोधकांना लक्ष करणाऱ्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहेत. काल, पोलिसांनी त्यांना कारणे नोटीस बजावल्यानंतर आज, महाराष्ट्र विधीमंडळाने दुसऱ्यांदा हक्कभंगाची नोटीस पाठवली आहे. त्यांच्यावर विधीमंडळाने गोपनीयतेच्या अटीवर दिलेले कार्यवृत्त परवानगीशिवाय न्यायालयात सादर केल्याचा आरोप आहे. त्यांनी दोनवेळी विधीमंडळाचा हक्कभंग केल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे.;

Update: 2020-10-14 17:58 GMT

विधीमंडळाने पावसाळी अधिवेशनात अर्णब गोस्वामीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख आणि सरकारची विनाधार बदनामी केल्याच्या आरोपाखाली हक्कभंग नोटीस बजावली होती. या नोटीससोबत विधिमंडळाने अर्णब गोस्वामी यांना माहितीसाठी त्या दिवशीचे कार्यवृत्त देखील गोपनीयतेच्या अटी-शर्ती घालून दिले होते. या अटी शर्तींनुसार विधीमंडळाच्या अध्यक्षांच्या परवानगीशिवाय विधिमंडळाचे कार्यवृत्त न्यायालयीन अथवा इतर कोणत्याही कामकाजासाठी वापरता येऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले होते.

तरी अर्णव गोस्वामी यांनी विधिमंडळाच्या कार्य वृत्ताचा वापर करून सर्वोच्च न्यायालयात विधिमंडळात विरोधात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, मंगळवारी अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.यामध्ये त्यांनी 'पूछता है भारत' शो मध्ये समाजामध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांमध्ये अटक का करू नये? अशी विचारणा केली होती. पोलिसांनी बजावलेल्या नोटिशीवर अर्णब गोस्वामी यांना प्रक्षोभक वक्तव्य करणार नाही, असे लेखी बंधपत्र द्यावे लागणार आहे. तसेच १० हजार रुपये जामिनासाठी भरावे लागणार आहे.




Tags:    

Similar News