अर्णब गोस्वामीचा जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धावा

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले रिपब्लिक वाहीनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांची जामिनासाठी त्रेधातिरपीट उडाली असून मोठी वकिलांची फौज तैनात करुन अलिबाग सत्र न्यायालयात जामिन अर्ज केल्यानंतर त्यांनी आज पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गोस्वामींची दिवाळी तुरुंगात होणार कि तुरुंगाबाहेर हे आता सत्रन्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय ठरविणार आहे.;

Update: 2020-11-10 08:45 GMT

रिपब्लिक टिव्हीचे मुख्य संपादक, अर्णब गोस्वामी यांनी इंटीरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात अंतरिम जामीन फेटाळण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

उच्च न्यायालयाने गोस्वामींचा जामिन नाकारत सत्र न्यायालयात जाण्यासाठी आणि नियमित जामीन मिळण्यासाठी गोस्वामीला कायद्यानुसार उपाय असल्याचे हायकोर्टाने नमूद केले होते. उच्च न्यायालय गोस्वामी आणि अन्य दोन आरोपी फिरोज शेख आणि नितीश सारडा यांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी दरम्यान त्यांच्या "बेकायदेशीर अटक" ला आव्हान देणारी आणि अंतरिम जामीन मिळविण्याच्या मागणी केली होती. गोस्वामी बरोबर फिरोज शेखचा नातेवाईक परवीन शेख यांनीही आरोपींना जामीन मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

न्यायालयीन कोठडीत असताना मोबाईल फोन वापरत असल्याचे समजल्यानंतर रविवारी त्याला रायगड जिल्ह्यातील तळोजा तुरूंगात हलविण्यात आले. दरम्यान रिपब्लिक टीव्हीचे प्रदीप भंडारी यांनी अरुण गोस्वामी यांच्या अटकेदरम्यान "मानवाधिकार उल्लंघन" झाल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती एसए बोबडे यांना आग्रह केला आहे.

Tags:    

Similar News