सोशल मीडियावर कायम चर्चेत राहणाऱ्या अमृता फडणवीस यांनी आता आणखी एक ट्विट केले आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या टीकेला अमृता फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. परमबीर सिंग प्रकरणावरुन सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले आहेत. त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. याबद्दलच एका वृत्त वाहिनीशी बोलताना भाई जगताप यांनी असे म्हटले होते की, "राजीनामा मागणाऱ्या फडणवीस यांनी आधी पोलिसांची खाती बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती याचे उत्तर द्यावं, असे म्हटले होते.
भाई जगताप यांच्या या ट्विटवर अमृता फडणवीस यांनी रिट्विट करत, " ए भाई , तू जो कोण असशील - माझ्या वर बोट उचलायचं न्हाय ! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यात तुम्ही 'UTI बैंक / Axis बैंक ' ला योग्यता पाहून दिली होती ! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय!" भाई जगताप यांना इशारा दिला आहे.