बारामती आणि पवार कुटूंब असं समीकरण प्रत्येक निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळतं. यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत अजित पवार नेहमीप्रमाणे बारामतीतून राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. मात्र, अजित पवार यांना राज्यात विविध ठिकाणी सभा घ्याव्या लागत असल्याने स्वत:च्या मतदारसंघात थांबायला वेळ मिळत नाही.
त्यातच यंदाच्या निवडणूकीत धनगर समाजाचे मतदान जास्त असल्याने बारामतीतून धनगर समाजाच्या गोपिचंद पडळकर यांना उमेदवारी देऊन अजित पवार यांच्या समोर तगडं आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
अशा परिस्थित अजित पवार यांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्याचं काम अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार करत आहेत.