किरण माने यांची नवी पोस्ट, निर्मात्यांवर गंभीर आरोप

राज्यातील मनोरंजन क्षेत्रातील सांस्कृतिक दहशतवादाचे बळी ठरलेल्या किरण माने यांनी रविवारी आणखी एक नवीन पोस्ट टाकत गंभीर आरोप केला आहे.;

Update: 2022-01-16 06:42 GMT

राजकीय पोस्ट लिहिल्यामुळे स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो या मालिकेतून काढून टाकण्यात आलेले अभिनेते किरण माने सध्या जोरदार चर्चेत आहेत. आपण आपली वैयक्तिक राजकीय मतं सोशल मीडियावर व्यक्त केली म्हणून मालिकेच्या निर्मात्यांनी आपल्याला काढून टाकले, असा आरोप त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतना केला आहे. या वादानंतर आता किरण माने यांनी पुन्हा एक नवीन फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी काही गंभीर आणि थेट आरोप केले आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले आहे ते पाहूया...



 



"आपली तुफानी मोहीम पाहून, घाबरुन जाऊन प्रॉडक्शन हाऊसकडून पुढच्या मोठ्या कारस्थानाचा भाग सुरू..

... आज मिडीयावाले सेटवर जाणार आहेत...अनेक कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची सक्ती केली गेलेली आहे... करुद्या आरोप.. जाऊद्या झाडून.. ते बिचारे 'पोटार्थी' हायेत. प्राॅडक्शन हाऊस विरोधात बोलणं त्यांच्या पोटावर पाय आणेल. माझ्यासारखं काढून टाकलं जाईल म्हणून हादरलेत बिचारे... चारेक संघविचारी खरोखर माझ्या विरोधात आहेत.. बाकीच्यांवर मनाविरूद्ध जाऊन माझ्या विरोधात बोलावं लागणार.. तरीही ज्यांच्या पाठीचा कणा मजबूत आहे, ते 'सत्य' सांगतीलच !

पण दोस्तांनो, असल्या भंपकपणावर इस्वास ठेऊ नका. मराठीत लोटांगन घालनारे आनी लाळघोटे कलाकार ढीग आहेत. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, हे तुमी ठरवा !

मी बी कंबर कसलेली हाय..कच्च्या गुरूचा चेला नाय मी !

तुका म्हणे रणी...नये पाहो परतोनी !!!

- किरण माने.

किरण माने यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. तसेच आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली होती. दरम्यान या मालिकेच्या निर्मात्यांनी व्य़ावसायिक कारणामुळे किरण माने यांना काढल्याचे स्पष्टीकरण दिल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. पण भाजप विरोधात सातत्याने लिखाण केल्याने किरण माने यांना काढण्यात आल्याचा आरोप होतो आहे.

Tags:    

Similar News