मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर तिथल्या कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. जेलमध्ये आणखी ८१ जण कोरोनाबाधीत आढळले आहेत. त्यामुळे आता इथल्या एकूण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या १८४ झाली आहे. यामध्ये २६ जेल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे तर उर्वरित जेलमधील कैदी आहेत.
दरम्यान मुंबईत एका दिवसात कोरोनाचे ८७५ नवीन रुग्ण आढळल्याने मुंबईतील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या आता १३ हजार ५६४ झाली आहे.