गरीबीला कंटाळून आत्महत्या केलेल्या कुटुंबाची जबाबदारी एकनाथ शिंदेंनी घेतली

Update: 2019-07-13 11:42 GMT

जव्हार- नव-यानं गळफास घेवून आत्महत्या केल्यानंतर पत्नी वृक्षला हिने स्वत:चा आणि चार लहान मुलींचा सांभाळ कसा करायचा या विवंचनेतून स्वतःसह दोन चिमुरड्या मुलींना विष पाजून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात वृक्षला सह तीन वर्षांच्या दीपालीचा मृत्यु झाला तर ७ महिन्यांची वृषाली सुदैवान वाचलीय. घटना घडली तेव्हा सुमिता (९ वर्षे) आणि जागृती (७ वर्षे) या शाळेत गेलेल्या होत्या, त्यामुळं त्या वाचल्या. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र गहिवरून गेला होता. दरम्यान या घटनेची दखल घेत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कुटुंबातील मुलींची भेट घेऊन त्या कुटुंबाच्या पुर्नवसनाची जबाबदारी घेतलीय.

जव्हार येथील कुटीर रुग्णालयात एकनाथ शिंदे मुलींना भेट दिली. या कुटुंबाला राहण्यासाठी घर, आर्थिक मदतीशिवाय इतर मदत करण्याची जबाबदारी घेत या कुटुंबाचं पुनर्वसन करणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.

हातात रोजगार नाही, सततच्या गरिबीला कंटाळून या कुटुंबियातील प्रमुखांनी आपले जीवन संपवले. मात्र, त्यांच्या अशा जाण्यानं मुलींचं भवितव्य उघड्यावर आलं असून आता या कुटुंबाच्या पुर्नवसनाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.

Full View

Similar News