महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर १५० जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं घोषित करण्यात आलं आहे. आज संध्याकाळी मनसेने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केलेली आहे. यामध्ये मनसेने माहिम मतदारसंघातून मनसेचे माजी नगराध्यक्ष संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. माहिम हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात मनसेचं इंजिन चालणार का? या संदर्भात संदीप देशपांडे यांच्याशी मॅक्समहाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी घेतलेली Exclusive मुलाखत