सत्ता महाविकास आघाडीची, पण प्रशासनावर भाजप व RSS चीच कमांड: आनंदराज आंबेडकर
राज्यात धार्मिक मुद्द्यावर राजकीय, सामाजिक वातावरण तापले आहे. याच मुद्द्यावरून आनंदराज आंबेडकर यांनी महाविकास आघाडी आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. राज्यात सत्ता महाविकास आघाडीची असली तरी प्रशासनावर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पगडा आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी