रायगड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्ती कामाची पाहणी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली. यावेळी महामार्गावरच कामाच्या ठिकाणी त्यांची आणि खासदार सुनिल तटकरे यांनी भेट झाली. चव्हाण हे दौऱ्याच्या वेळेपेक्षा जलद आल्याचे सुनील तटकरे यांनी म्हटल्यानंतर हे गतिमान सरकार आहे, असा टोला रवींद्र चव्हाण यांनी लगावला.
नागोठणे, कामत ,वाकण, सुकेळी, खांब या ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्तीची रविंद्र चव्हाण यांनी पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कोल्ड मिक्स प्रेमिक्स या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्यातील खड्डा स्वच्छ केला जातो. त्यानंतर त्यात केमिकलयुक्त डांबर मिश्रित खडी टाकण्यात येते. तसेच त्यावर नंतर छोटा रोड रोलर फिरवून सपाट केले जाते. त्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे खड्डे होत नाहीत, असे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.