सध्या देशात आर्थिक मंदी आहे. त्यामुळे देशातील अनेक तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड आली आहे. प्रत्येक निवडणुकीत राज्यकर्ते, विरोधी पक्ष रोजगाराचं आश्वासन देत असतात. मात्र, प्रत्यक्षात ते पूर्ण होतं का?
सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात तरुणांना नक्की काय हवं आहे. येणाऱ्या सरकारकडून या तरुणांच्या काय अपेक्षा आहेत. या संदर्भात आम्ही मानखुर्द - शिवाजी नगर या भागात बेरोजगार, शिक्षण या सारखे अनेक प्रश्न आज ही प्रलंबित आहेत, यापूर्वी जे आमदार निवडून आले त्यांनी नक्की काय केले या संदर्भात मॅक्समहाराष्ट्र चे प्रतिनिधी प्रसन्नजित जाधव यांनी या तरुणांशी बातचित करुन येणाऱ्या विधानसभेत त्यांच्या काय अपेक्षा आहेत. हे जाणून घेतलं. पाहा काय या जनतेचा जाहीरनामा