मोदी है तो मुमकीन है! देशाचा GDP शुन्याच्या खाली...

Update: 2020-09-01 10:08 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi ) देशाची इकॉनोमी ५ Trillion Doller Economy चं स्वप्न दाखवत आहेत. मात्र, देशाच्या जीडीपीत (GDP) ऐतिहासिक घसरण झाली आहे. जागतिक आर्थिक मंदी आणि कोरोना महामारीचे संकट यामुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. महामारीच्या संकटामुळे २०२०-२०२१ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी शून्याच्या खाली गेला.

राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल ते जून २०२०-२१ या तिमाहीत भारताचा जीडीपी शून्याच्या खाली -२३.९ टक्के (India GDP minus 23.9 percent). इतका खाली आला आहे.४० वर्षांत देशाचा GFP पहिल्यांदाच इतक्या खाली आहे. आता GDP म्हणजे काय? हा प्रश्न तुमच्या मनात पडला असेल.

तर जीडीपी म्हणजे कोणत्याही देशाचं एका विशिष्ठ काळात तयार झालेल्या सर्व वस्तू आणि सेवांचे मूल्य अथवा बाजार मूल्य म्हणजे GDP होय.. जीडीपीची आकडेवारी दर तिमाहीला प्रसिद्ध होते. कृषी, उद्योग आणि सेवा या तीन आघाड्यांवर उत्पादन वधारलं किंवा घटण्याच्या सरासरीद्वारे जीडीपीचा दर ठरवला जातो.

GDP ची आकडेवारी देशाचं आर्थिक स्वास्थ स्पष्ट करते. शेती सोडून बाकीच्या सर्वच क्षेत्रांचा ग्रोथ रेट शून्याखाली गेला आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था रसातळाला गेल्याचं स्पष्ट होतं. त्याचबरोबर जर देशाचा जीडीपी इतक्या मोठ्या प्रमाणात खाली असेल तर किती मोठ्या प्रमाणात उत्पादन कमी झाले असेल? आणि जर उत्पादन कमी झाले असेल तर किती रोजगार गेले असतील? याचा ही विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळं येत्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निश्चितच मोठं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

GDP ची घसरण झाल्यानं भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार? बॅकिंग, सेवा क्षेत्राला किती फटका बसणार... यावर बॅंकिंग तज्ञ विश्वास उटगी यांनी केलेलं विश्लेषण नक्की पाहा...

Full View

Similar News