डॅनिअल मस्करणिस हा इंजिनियर तरुण साधना कार्यालयात एक टंकलिखित बाड घेऊन आला. साधना प्रकाशना कडून पुस्तक प्रकाशित होऊ शकेल का, याची शक्यता तपासण्यासाठी.ख्रिस्ती धर्म आणि विवेकवाद या संदर्भातील चर्चा त्या लेखनाच्या केंद्रस्थानी होती. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्त्या झाल्यानंतर डॅनिअलच्या मनात या लेखनाचे बीज पडले होते. प्रवाही भाषा, सुबोध मांडणी आणि युक्तिवाच्या धाडसी तर्कशुद्ध लेखन ``मंच`` पुस्तकांच्या रुपानं पुढं आलं. डॅनिअल मस्करणिस लिखीत `मंच` ला ताराबाई शिंदे ललित गद्य पुरस्कार जाहीर झाला असून त्यानिमित्तानं त्यांनी Max Maharashra शी साधलेला संवाद....