संपकरी एसटी कर्मचारी आता कामावर रुजू होऊ लागल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली एस टी आता रस्तावर धावायला सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील गावागावांना जोडणारी रक्त वाहिनी तसेच आर्थिक कणा असलेली एस टी सुरू झाल्याने एसटीवर अवलंबून असलेल्या लहान लहान विक्रेते व्यावसायिकांना देखील दिलासा मिळाला आहे. पण एसटी कर्मचाऱ्यांची नाराजी अजूनही दूर झालेली नाही. सरकारने आमच्या पदरी काहीही दिलं नसल्याची खंत काही कर्मचारी व्यक्त करत आहेत. कोरोना आणि त्यानंतर संप यामुळे एसटी स्टँडही सुने झाले होते, या एसटी स्टँडवरील वातावरणाचा आढावा घेतला आहे संतोष सोनवणे यांनी...