डाव्यांच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी मोदींचा नवा डाव?

JNU मध्ये स्वामी विवेकानंदाचा पुतळा उभारुन भाजप काय करु पाहत आहे? काय आहे संघाचा अजेंडा? डाव्यांच्या बाल्लेकिल्ल्यात राष्ट्रवादाचा सुरुंग लावून भाजप डाव्यांचा गड उद्वस्त करु पाहत आहे का? वाचा;

Update: 2020-09-15 07:30 GMT

वेगवेगळ्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. जेएनयू विद्यापीठात स्वामी विवेकानंद यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. डाव्या विचारसरणीचा गड समजल्या जाणाऱ्या जेएनयू मध्ये मोदींनी १२ नोव्हेंबर ला स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचं उद्घघाटन केलं आहेया पुतळ्याच्या उद्घाटनाच्या अगोदर पुतळ्याच्या पायथ्याशी आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता.

त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं. आक्षेपार्ह मजकूर असलेल्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर 'आरएसएस'प्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी संघटना (एबीव्हीपी) व जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटना (जेएनयूएसयू) यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. या आक्षेपार्य मजकुरासंदर्भात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातच सध्या 'जेएनयू' मध्ये विद्यार्थी वसतिगृहाच्या फी वाढीविरोधात आंदोलन करत आहे. या आंदोलनादरम्यान स्वामी विवेकानंदांचा पुतळा असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या परिसरात हे आंदोलन सुरु आहे. त्यामुळं आंदोलकांनी ही इमारत ताब्यात घेतली असताना पुतळ्याची विटंबना करण्यात आली. तसंच कुलगुरुंच्या विरोधात घोषणाबाजी ही करण्यात आली आहे.

या संदर्भात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, मा‌र्क्स आणि लेनिन च्या विचारांचा पगडा असलेल्या जेएनयू मध्ये मोदींनी प्रखर सांस्कृतिक राष्ट्रवादांची बीज पेरण्याचा प्रयत्न या पुतळ्यांच्या माध्यमातून केला आहे का? डाव्यांच्या बालेकिल्ल्यात या निमित्ताने मोदींनी राष्ट्रवादी विचारांचा खिळा ठोकला आहे का? या पुतळ्याच्या उद्घाटनामध्ये स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष रुची घेतल्याने स्वामी विवेकानंदाचा पुतळा उभारण्यामागे भाजप आणि संघाचा नक्की काय विचार आहे? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो. साधारण ३ वर्षापुर्वी हा पुतळा तयार करण्यास सुरुवात झाली होती. साधारणपणे २०१८ ला या पुतळ्याचं काम पूर्ण झालं. मात्र, आत्तापर्यंत हा पुतळा झाकलेला होता.

या पुतळ्याच्या निर्मितीवरच काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला होता. पुतळा तयार करण्यासाठी पैसे कुठून आले? विद्यार्थ्यांच्या ग्रंथालयाचे पैसे यासाठी वापरले का? असा सवाल देखील विद्यार्थ्यांनी उपस्थित केला होता. तर प्रशासनाच्या वतीनं या पुतळ्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पैसे दिल्याचं सांगितलं होतं.

भाजप आणि विवेकानंद नक्की काय कनेक्शन आहे?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीत तुम्हाला 'सांस्‍कृतिक राष्‍ट्रवाद' पाहायला मिळेल. RSS स्‍वामी विवेकानंद यांना या विचारधारेसाठी प्रेरणादायी मानतो. नुकत्याच नागपूर येथे संघाच्या शस्त्र पुजनाच्या कार्यक्रमात सरसंघचालक यांनी केलेल्या संबोधनात तुम्हाला स्वामी विवेकानंद यांचा उल्लेख केलेला आढळेल. २०१४ ला केंद्रात सत्ता बदल झाला. मात्र, ५१ वर्षामध्ये भाजप शी निगडीत असलेल्या 'आरएसएस'प्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी संघटना (एबीव्हीपी) ला एकदाही जेएनयू मध्ये अध्यक्षपद मिळवण्यात यश आलेलं नाही. त्यामुळं डाव्या विचारसरणीच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी मोदींनी सांस्कृतीक राष्ट्रवादाची बीज पेरायला सुरुवात केली आहेत. असं म्हणायला वाव आहे.

त्यातच पश्चिम बंगालमध्ये स्वामी विवेकानंद यांना मानणारा एक वर्ग आहे. पश्चिम बंगाल मध्ये निवडणूका असल्यानं ममता बॅनर्जी सह डाव्यांना तोंड देण्यासाठी मोदींनी ही रणनीती आखल्याचं बोललं जात आहे.

Why PM Modi unveils statue of Swami Vivekananda at Jawaharlal Nehru University campus

Tags:    

Similar News