जयंत पाटील यांची चौकशी कशासाठी? वाचा नेमकं काय आहे कारण?
गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील यांना आलेल्या ईडीच्या नोटीशीची चर्चा रंगली आहे. पण जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी का? याची चर्चा रंगली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? जाणून घेण्यासाठी वाचा...;
गेल्या काही वर्षात महाविकास आघाडीच्या नेत्यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. त्यातच आता जयंत पाटील यांच्या नावाची भर पडली आहे. ईडीच्या चौकशीसाठी जयंत पाटील सोमवारी ईडी कार्यालयात जाणार आहेत. पण जयंत पाटील यांची चौकशी कोणत्या प्रकरणात सुरू आहे?
जयंत पाटील यांची आय एल अँड एफ एस (IL And FS company) या कंपनीच्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी (Money laundering) करण्यासाठी ईडीने नोटीस पाठवली आहे.
IL And FS या कंपनीच्या व्यवहारांची चौकशी सुरू होती. यातच कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली. पण कंपनीच्या व्यवहारात अनियमितता होती. त्यामुळे या कंपनीच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.
IL & FS कंपनी प्रकरणी अरुणकुमार साहा (Arunkumar Saha) यांची चौकशी करण्यात आली होती. त्यामध्ये अनेक नावं समोर आले. त्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याही नावाचा समावेश आहे.
IL And FS कंपनी काय आहे?
इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (Infrastructure leasing and Financial services limited) ही एक पायाभूत सुविधा विकास (Infrastructure development) आणि वित्त कंपनी (Financial Company) आहे. ही कंपनी सार्वजनिक क्षेत्रातील बँका (public Bank) आणि विमा कंपन्यांनी (Insurance Company) तयार केली आहे.
या कंपनीची स्थापना 1987 मध्ये RBI नोंदणीकृत कोर इन्व्हेस्टमेंट कंपनी (Investment Company) म्हणून सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India), हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (Housing development finance corporation) आणि युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (Unit Trust of India) या बँक आणि विमा कंपन्यांनी (Bank an Insurance Company) केली. याचं प्रमुख कारण पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी वित्त आणि कर्ज प्रदान करण्यासाठी या कंपन्यांची स्थापना करण्यात आली.
याच प्रकरणाच्या चौकशीसाठी जयंत पाटील ईडीच्या कार्यालयात हजर होणार आहेत.