राज्यात महाविकास आघाडी सरकारने वीज कपात केल्यामुळे राज्यातील जनतेला लोडशेडींगचा सामना करावा लागत आहे. त्याविरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावरून एकनाथ खडसे यांनी भाजपला टोला लगावला. तर भाजप महागाई विरोधात आंदोलन का करत नाही, असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला. तसेच भाजपच्या जाहीरनाम्यात मोफत आणि मुबलक वीज देण्यात येणार होती. त्या दोन्हीही घोषणा पुर्ण करणे भाजपला सरकार असताना शक्य झाले नाही. त्यामुळे सध्या भाजप फक्त विरोधक म्हणून विरोधाची भुमिका बजावत असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली.