केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्ष चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले होते. त्या विरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी आज सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे.
शिवसेना कुणाची? याबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार होती. त्यामुळे ठाकरे गटाकडे शिल्लक असलेली ही शेवटची संधी असणार आहे. मात्र ही सुनावणी सुप्रीम कोर्टात होऊ शकली नाही. त्यामुळे ही सुनावणी पुढील दोन ते तीन दिवसात होण्याची शक्यता आहे.
दरम्यान विधानसभा अध्यक्षांचे अधिकार स्पष्ट करण्यासंदर्भात असलेली नबाम रेबिया केसचा पुनर्विचार करण्यासाठी सात सदस्यीय घटनापीठ उद्या सुनावणी सुरू करणार आहे. तर शुक्रवारी शिवसेना आणि राष्ट्रवादीतील आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी होणार आहे. त्यामुळे या आठवड्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना याबाबतच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.