पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री केल्याने काम मिळत नाही: श्याम रंगीला
मिमिक्रीच्या दुनियेतील एक प्रसिद्ध नाव म्हणजे श्याम रंगीला. ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री करत स्वतःची ओळख निर्माण केली. मात्र, पंतप्रधान मोदींची मिमिक्री केल्यापासून श्याम रंगीला यांना काम मिळत नसल्याचं त्यांनी त्यांच्या ट्विटद्वारे सांगितल आहे. श्याम रंगीलाने या संदर्भात ट्वीट केला आहे. त्यांच्या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदींना सुद्धा टॅग केलं आहे. पंतप्रधानांची मिमिक्री केल्याने त्याला टीव्ही शोमध्ये काम मिळत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे ट्वीटमध्ये -
प्रिय PM श्री नरेंद्र मोदी जी, मी एक छोटा कलाकार आहे. मी तुमची व अनेक लोकांची मिमिक्री करतो. मात्र मी माझी मिमिक्री ची कला टीव्हीवर सादर करू शकत नाही. याचं मला दुःख वाटतं. कारण, माध्यमांमधील लोक तुम्हाला घाबरतात. मात्र, तुम्हाला तर विनोद आवडतात, मग हे लोक तुमच्या मिमिक्रीला का घाबरतात. तुमची मिमिक्री करणं हा गुन्हा आहे का?
प्रिय PM श्री @narendramodi जी…मैं एक छोटा सा कलाकार हूँ,आपकी व कई लोगों की मिमिक्री करता हूँ।दुःखद है कि मैं ये कभी TV पर नहीं कर सकता क्यूँकि TV चैनल के लोग आपसे डरते है।आपको तो मज़ाक़ पसंद भी है, तो फिर भी वे क्यूँ डरते है आपकी मिमिक्री से?
— Shyam Rangeela (@ShyamRangeela) April 16, 2022
क्या आपकी मिमिक्री जुर्म है?
1/2
स्वतःची व्यथा मांडताना श्याम रंगीला पुढे लिहितो - लाफ्टर चॅलेंज (2017) नंतर मी अनेकदा टीव्ही शो सोबत बोलणं व्हायचं पण शेवटी सगळे म्हणायचे की, श्याम चॅनल तुला परवानगी देत नाहीये. आणि हेच आजही घडलं, म्हणूनच 5 वर्षांनी मला त्यावर लिहिणं भाग पडलं आहे. प्रत्येकजण मिमिक्रीला का घाबरतो? सोशल मीडिया नसता तर हा श्याम रंगीला कधीच संपला असता, तुम्ही सर्वांनी मला नेहमीच सोशल मीडियावरील कोणत्याही टीव्ही शोपेक्षा जास्त प्रेम दिले आहे, त्यामुळे आज मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. माझ्यासारख्या कलाकारांनी हे लक्षात घ्यावं की, 'बाबांनो, महागाई वर इथून पुढेही तुम्ही तुमचं तोंड बंदच ठेवा. कारण हा नवा भारत आहे. इथे तुम्हाला क्षणाचीही संधी देणार नाहीत.
श्याम रंगीला म्हणतो की, ते हे सर्व सहानुभूतीपोटी लिहीत नसून जे सत्य आहे ते लिहित आहे. मात्र, श्याम रंगीलांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर लोक त्यांच्या मदतीला धावून आल्याचं दिसून येत आहे.
हर्ष नावाच्या एका युजरने लिहिले की, तुमच्या टॅलेंटला कोणत्याही टीव्ही चॅनलने भुरळ घातली नाही. चालत रहा भाऊ तू खूप पुढे जाशील.
आणखी एका युजरने लिहिले की, तू तुझं काम सोशल मीडियावर सुरू ठेव. हळुहळू लोक टीव्ही चॅनेल्सपासून दुरावत आहेत आणि सोशल मीडियाकडे वळत आहेत.
यासोबतच, एनआर कदम नावाच्या एका युजरने लिहिले की, 'श्याम रंगीला जी, तुम्ही एकटेच मिमिक्री आर्टिस्ट नाहीत. कोणी शिव्या दिल्याने मोदीजींना कधीच वाईट वाटत नाही, त्यांचा तुमच्या मिमिक्रीशी काय संबंध?
अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर युजर्सने दिल्या आहेत.