महंताचा विरोध झुगारुन संयोगीताराजें म्हणाल्या वेदोक्त मंत्र...

नाशिक येथील काळाराम मंदिरात छ. संयोगीताराजे यांच्या पूजेवेळी तेथील महंताने वेदोक्त मंत्र म्हणण्यास नकार दिला. यानंतर स्वतः मंत्र म्हणत संयोगीताराजे यांनी महंताचा विरोध मोडीत काढला आहे. काय घडला हा प्रकार वाचा सविस्तर…;

Update: 2023-03-31 11:08 GMT


नाशिक येथील काळाराम मंदिरात (Kalaram mandir nashik)छत्रपती संयोगीताराजे पूजा करत होत्या. पूजेच्या वेळी तेथील महंत हा पुर्णोक्त मंत्र म्हणत आहे हे त्यांच्या लक्षात आले. यावर त्यांनी जाब विचारला. महंताने नकार दिल्यावर संयोगिताराजे यांनी महंताचा विरोध झुगारत स्वतः मंत्र म्हटले.

यावर संयोगीताराजे यांना वेदोक्त मंत्र म्हणण्याचा अधिकार कसा नाही याचे स्पष्टीकरण सदर महंत देऊ लागला. यानंतर त्या चांगल्याच कडाडल्या. आम्ही परमेश्वराची लेकरे असून त्याची स्तुती करताना त्याला भेटताना आम्हाला कुणा मध्यस्थीची गरज नसल्याचे त्यांनी महंताला ठणकावले.

सदर घडलेला प्रकार त्यांनी इंस्टाग्रामच्या माध्यमातुन लोकांसमोर आणला आहे. शंभर वर्षे उलटून देखील ही मानसिकता का बदलत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Full View

काय आहे वेदोक्त प्रकरण ?

महंताकडून दिलेल्या वागणुकीचा हा पहिलाच प्रकार नाही. या अगोदर छ. शिवाजी महाराज आणि छ. शाहू महाराज यांच्या बाबतीत देखील असा प्रकार घडलेला होता. पण या दोन्ही महान राज्यांनी हा विरोध मोडीत काढून या सनातनी विचारांच्या प्रवृत्तीला फाटा दिला होता.

काय घडले होते छत्रपती शिवरायांच्या आयुष्यात ?

छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या (shivaji maharaj)राज्याभिषेकाला तत्कालिन ब्राह्मणांनी विरोध केला होता. ते क्षत्रीय नाहीत त्यामुळे त्यांना राजा होण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले होते. पण शिवरायांनी हा विरोध मोडीत काढून वाराणसीतील गागाभट (gagabhat)या ब्राह्मणाला संपत्ती देउन बोलावले. त्याच्याकडून आपला राज्याभिषेक करुन घेतला.

छत्रपती शाहू राजांवर देखील हा प्रसंग ओढवला होता

असाच एक प्रसंग छ. शाहु राजांच्या आयुष्यात घडला होता. एका सकाळी ते अंघोळीला तलावावर गेले होते. अंघोळ करताना त्यांच्या लक्षात आले की भटजी वेदोक्त मंत्र न म्हणता पुर्णोक्त पद्धतीचे मंत्र म्हणत आहे. त्यांनी त्याबाबत त्याला विचारले असता त्याने सांगितले की, “वेदोक्त मंत्र फक्त क्षत्रियासाठी म्हणतात”. यावर महाराज चीडले. यानंतर त्यांनी ब्राम्हणेतर चळवळ सुरू केली. वेदोक्त प्रकरणात लोकमान्य टिळकांनी (Lokmanya tilak)ब्राह्मणांची बाजू घेतली होती.या चळवळीचे नेतृत्व केले. त्यांनी पौरोहीत्य प्रशिक्षण देणाय्रा शाळा सुरू केल्या. त्यातुन बहुजनातील (Bahujan)पुजारी, जंगम, गुरव , स्वामी निर्माण झाले. ते आजही गावगाड्यात पौरोहीत्य करताना दिसतात.

मराठ्यांना शुद्र (shudra)ठरवणारे पुण्यातील खोले बाईचे प्रकरण काय होते ?

पुण्यातील (pune)सोवळं प्रकरण महाराष्ट्रातील चर्चेचा विषय बनले होते. मेधा खोले नावाच्या एका स्त्रीने निर्मला यादव या मराठा स्त्रीच्या विरोधात जातीवरून फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीत तिने माझ्या घरातील सोवळ्याच्या स्वयंपाकास ब्राम्हण महीला आवश्यक असताना, जात लपऊन माझा सोवळ्याचा स्वयंपाक केला. त्यामुळे माझे सोवळे बाटले. सदर स्त्रीवर गुन्हा दाखल करावा यासाठी पोलीसात एफ. आय. आर. दाखल केला होता.

स्वयंपाक करणारी स्त्री मराठा असल्याच्या संशयातून हि तक्रारदार महीला तिच्या घरी गेली तेंव्हा तिला तेथे छ. शिवाजी महाराजांचा फोटो दिसला व त्यावरून तिने जात विचारली. त्यावेळी सदर स्त्री मराठा आहे असे तिला समजले. ती भडकली व तिचे सोवळे बाटल्याचे कारण देत पोलीसांत तक्रार दाखल केली.

अशा प्रकारे भेदभावाच्या या घटना घडलेल्या आहेत. या सर्व घटनांमध्ये या प्रवृत्तीला जोरदार विरोध करण्यात आला आहे. संयोगीताराजे ( sanyogitaraje )यांनीही या महंतांना या प्रसंगी जोरदार विरोध केला आहे…

Tags:    

Similar News