रविकांत तुपकरांचं शिंदे गटातील आमदारांना खुलं आव्हान; हिंंमत असेल तर माझ्याशी भिडावं
राज्याचं राजकीय वातावतरण येणाऱ्या लोकसभा निवडणूकीमुळे चांगलंच तापलेलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्याविषयी शिंदे गटाचे आमदार डॉ. संजत रायमुलकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, यावर आता तुपकरांनी सुध्दा त्यांना प्रत्युत्तर देत एक खुलं आव्हान केलं आहे.
तुम्ही माझ्याकडे भाड्याने लावलेली गुंड पाठवता, खरीच हिंम्मत असेल तर खासदार आणि आमदारांनी माझ्याशी मुकाबला करत दोन हात करावेत. त्यासाठी माझी पूर्णतः तयारी आहे, अशा कडक शब्दांत रविकांत तुपकरांनी खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार संजय रायमुलकर यांना खुलं आव्हान केलं आहे.
मला गजाआड करण्याचा कट रचला जातोय
लोकसभा निवडणूकीपासून आम्हाला वंचित ठेवायचं म्हणून एक वर्षासाठी तुरूंगात ठेवायची मागणी सरकारने न्यायालयात केली आहे. त्यामुळे मला तुरूंगात टाकण्याचं सरकारचं नियोजन चालू आहे. माझ्यावर विविध कलमे लावून मला तडीपार करण्याचं सुध्दा सरकारचं षडयंत्र चालू आहे, अशा शब्दांत तुपकरांनी सरकारवर घणाघात केला.
बुलढाण्यातील एल्गार सभेमध्ये शेतकरी संघर्ष यात्रेच्या समारोपावेळी उपस्थितांना संबोधित करताना रविकांत तुपकर बोलत होते. पुढे त्यांनी प्रतापराव जाधव यांचाही उल्लेख करत टीका केली. मला फासावर चढवा अथवा तुरूंगात टाका, मात्र मी तुरूंगातून लोकसभा निगडणूक लढवणार पण; थांबणार नाही, असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला.