"आम्हाला मतदार संघातील लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे आणि देशाचे नेते असलेले शरद पवार साहेब यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून व महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्राला एक स्थिर सरकार द्याव. महाराष्ट्रात पुन्हा शेतकऱ्यांच्या हितासाठी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवन्यासाठी पुढाकार घ्या." अशी विनंती अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदार संघाचे युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी केली आहे.
"राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग केला आहे. शिवसेनेच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रावर ही पाळी आली आहे." अशी टीका आमदार रवी राणा यांनी केली आहे.