अमित शहांच्या पुणे दौऱ्यामध्ये काय 'राजकारण'शिजणार?

Update: 2023-08-06 05:31 GMT

 लोकसभा निवडणूक पूर्वी विरोधी पक्षांमधे खिंडार पाडणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्यात दाखल झाल्याने राजकीय तर्कवितरकांना उधाण आले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Amit shah) शनिवारी सायंकाळी पुण्यात दाखल झाले. अमित शहा पुण्यात एक तास लवकर पोहचले, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि इतर नेत्यांची चांगलीच धावपळ झाली.पुणे विमानतळावर अमित शहा यांचे स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील( Chandrakant patil) यांनी केले . दरम्यान, रविवारच्या एका कार्यक्रमासाठी शाह शनिवारी सायंकाळी पुण्यात दाखल झाल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे अमित शहा हे केंद्रीय निबंधक कार्यालयाच्या 'सहकार से स्रमृद्धी' या वेब पोर्टलच्या उद्घाटन समारंभासाठी पुण्यात दाखल झाले आहेत . पिंपरी-चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

चिंचवड येथे केंद्रीय सहकार संस्था निबंधक (CRCS) कार्यालयाच्या 'डिजिटल पोर्टल'चे उदघाटन अमित शाह रविवारी दुपारी बारा वाजता करणार आहेत. देशात 1550 हून अधिक नोंदणीकृत बहु-राज्य सहकारी संस्था आहेत. त्यांचे कामकाज सुलभ व्हावे म्हणून हे पोर्टल सुरु करण्यात आले आहे दरम्यान, मोदीही पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी आणि मावळातील तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशन विकास तथा आधुनिकीकरणाच्या भूमिपूजनाला 'ऑनलाइन' हजेरी लावणार आहेत. त्याच्या उदघाटनानंतर सायंकाळी शहा हे दिल्लीला परतणार आहेत.

शहा हे पुण्यात आल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पवार हेही मुंबईहून पुण्यात दाखल झाले ते पुण्यातील एका ताराकिंत हॉटेलात मुक्कामी आहेत. ही मंडळी एकाच हॉटेमध्ये दाखल झाली. त्यामुळे नव्या राजकीय घडामोडींना वेग येणार याचे संकेत मिळाले. ही मंडळी एकत्र आल्याने तेही एकाच हॉटेलमध्ये थांबल्याने नेमके काय घडणार याची उत्सुकता आहे. दरम्यान, लोकसभेची निवडणूक रणनिती आखण्य़ासाठीच ते एकत्र आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादीला खिंडार पडल्यानंतर आता

शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे देखील भाजपसोबत जाण्यासाठी अजित पवार गटात

दाखल होणार असल्याची चर्चा असल्याने आणखी किती लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांना खिंडार पाडणार याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Tags:    

Similar News