पंकजा मुंडे यांनी केली देवेंद्र फडणवीस यांची स्तुती
पंकजा मुंडे यांनी केली देवेंद्र फडणवीस यांची स्तुती
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. यावेळी पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या धोरणामुळे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षण गेलं असा आरोप त्यांनी केला. त्या औरंगाबाद येथे भाजपकडून आयोजीत केलेल्या ओबीसी मेळाव्यात बोलत होत्या.
यावेळी पंकजा मुंडे यांनी मी ओबीसी आरक्षणावर बोलली तर काही लोक मराठा आरक्षणावर बोलतात. मात्र, ज्या मुख्यमंत्र्यांची जात काढली त्याच मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण दिलं असं म्हणत पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली.
यावेळी पंकजा मुंडे यांनी ओबीसींना आरक्षण मिळालं नाही तर ओबीसी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा ठाकरे सरकारला देत ओबीसी समाजाबरोबरच मराठा आरक्षणाचीही मागणी केली.
पाहा काय म्हणाल्या पंकजा मुंडे