सध्या राज्याच्या राजकारणात औरंगाबाद, उस्मानाबाद शहरांच्या नामांतरावरुन वादविवाद सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर पहिल्यांदाच भाष्य केले आहे.
नामांतरावरुन महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले आहे. कुणी औरंगाबाद म्हटले, धाराशीव म्हटले किंवा उस्मानाबाद म्हटले त्याने काहीही फरक पडत नाही.
हा वाद एवढा गंभीर नसल्याने त्यावर आपण भाष्यही केलेले नाही, असेही शऱद पवारांनी म्हटले आहे. एकंदरीतच काँग्रेसने जरी नामांतराला विरोध केला असला महाविकास आघाडीत या मुद्द्यावरुन मतभेद नसल्याचे स्पष्ट झाले आहे.