नितीन गडकरींचा उमेदवारी अर्ज दाखल; भाजपने रॅली काढत केले शक्ती प्रदर्शन

Update: 2024-03-27 14:09 GMT

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) भाजपने बुधवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करतना महाराष्ट्राची दुसरी राजधानी (Capital) असलेल्या नागपुरात (Nagpur) भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शन केले.उमेदवारी अर्ज (Nomination form) दाखल करताना नितीन गडकरींसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,(CM, Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadanvis)अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते(NCP leader) आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल (Praful patel) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bavankule) आदी उपस्थित होते.


गडकरी हे नागपूर शहरातून खालच्या सभागृहात तिस-यांदा निवडून येण्याची अपेक्षा करत आहेत, जिथे लोकसभा निवडणूक 2024 मध्ये 19 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील पहिल्या पाच टप्प्यातील मतदान होणार आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी निघालेल्या भव्य रॅलीत पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. अशा पध्दतीची रॅली काढणे हे अभूतपूर्व नसले तरी गडकरींची लोकप्रियता आणि पक्षाची ताकद या दोन्ही गोष्टी नागपुरात प्रदर्शित करणे हे भाजपचे उद्दिष्ट होते, असे भाजपच्या निवडणूक रणनीतीकारांनी सांगितले.रॅलीच्या निमित्ताने जमलेल्या सर्व भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह जनतेला संबोधित करताना, गडकरींनी पक्ष कार्यकर्त्यांना स्पष्ट आवाहन केले आणि त्यांना मोठा जनादेश सुनिश्चित करण्यासाठी काम करण्यास सांगितले. नागपुरात भाजपला ७५ टक्के मते मिळवून देण्यासाठी प्रयत्न करूया. विजयाबद्दल काही शंका नाही पण आपण आपला मताचा हिस्सा सुधारण्यासाठी काम केले पाहिजे, असं गडकरी म्हणाले.




 


2014 आणि 2019 मध्ये गडकरींनी नागपूरमधून निवडणूक लढवली होती त्यावेळी 2014 मध्ये त्यांनी 5.87 लाख (54.17 टक्के) मते मिळवून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांचा पराभव केला होता. मुत्तेमवार यांना ३.०२ लाख (२७.९२ टक्के) मते मिळाली. 2019 मध्ये, गडकरींनी 4.44 लाख मते (37.45 टक्के) मिळविणारे तत्कालीन काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या विरोधात 6.60 लाख (55.67 टक्के) मते वाढवली.


उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जमलेल्या जनसमुदायाला संबोधित करताना सांगितले की, “गडकरी हे ‘विकासपुरुष अर्थात विकास घडवून आणणारा माणूस’ आहेत, ज्यांच्या कार्याची देशभरात दखल घेतली गेली आहे. गडकरींनी हाती घेतलेल्या पायाभूत सुविधांवर आधारित कामांमुळे देशभरात विकास झाला आहे.” असं फडणवीस म्हणाले.

नागपुरात काँग्रेसने गडकरींच्या विरोधात विकास ठाकरे(Vikas Thackary) यांना उमेदवारी दिल्याने दोन्ही पक्षांमध्ये थेट लढत होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.




 

Tags:    

Similar News