गृहमंत्र्यांनी भोंगे काढण्याची मागणी फेटाळली

गेल्या काही दिवसांपासून राज्यात भोंग्यांवरून राजकारण पेटले आहे. त्यातच राज ठाकरे यांनी भोंगे काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार दिला होता. मात्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भोंगे काढण्याची मागणी फेटाळली.;

Update: 2022-04-17 03:49 GMT

राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातून मशिदींवरील भोंगे काढण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांच्यावर सडकून टीका झाली. तर राज ठाकरे यांनी त्यांच्यावर झालेल्या टीकेला राज ठाकरे यांनी ठाण्यात घेतलेल्या उत्तरसभेतून उत्तर दिले. मात्र यावेळी त्यांनी 3 मे पर्यंत राज्य सरकारने मशिदींवरील भोंगे काढले नाही. तर ३ मे नंतर मशिदींसमोर मोठा भोंगा लावून हनुमान चालिसा पठन करण्याचा इशारा दिला होता. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत भोंगे लावू नयेत. तसेच इतर वेळी भोंग्याच्या आवाजाला मर्यादा घालून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मंदिर असो वा मशिद दोन्ही ठिकाणी पोलिसांची परवानगी घेऊन लावलेले भोंगे काढले जाणार नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांनी ३ मे नंतर भोंगे उतरवण्याबाबत दिलेल्या इशाऱ्यावरून आपली भुमिका स्पष्ट केली. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यात भोंगे लावण्याबाबत भुमिका घेणार असल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. तर राज ठाकरे यांनी ३ मेनंतर भोंगे काढण्याबाबत केलेली मागणी राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांनी फेटाळली.

राज्यात कोणत्याही प्रकारे धार्मिक वातावरण बिघडू नये यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी भोंगे काढण्याबाबत दिलेला अल्टीमेटम राज्याच्या गृहमंत्र्यांनी फेटाळला असल्याचे चित्र आहे.

कोल्हापुर निव़डणूकीतील विजय अपेक्षित होता

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोल्हापुर निवडणूकीत महाविकास आघाडीच्या जयश्री पाटील यांचा दणदणीत विजय झाला असल्याबद्दल विचारले असता कोल्हापुरमध्ये जयश्री पाटील यांचा विजय अपेक्षित होता. तसेच कोल्हापुरच्या जनतेने महागाई, जनतेचे प्रश्न यावर निवडणूक न लढवता धार्मिक मुद्द्यावर निवडणूक लढवली. त्याला कोल्हापुरच्या जनतेने उत्तर दिले असल्याची प्रतिक्रीया वळसे पाटील यांनी दिली.

Tags:    

Similar News