माजी पंतप्रधान देवेगौडा संसदेच्या गोंधळावर म्हणाले....

Update: 2023-08-11 03:48 GMT

90 वर्षीय जेडीएस पक्षाचे प्रमुख आणि कर्नाटकातील राज्यसभा सदस्य, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी आरडाओरडा, नाव पुकारणे आणि घोषणा देण्याच्या कृतींबद्दल नाराजी व्यक्त केली. संसदेत व्यत्यय आणि गोंधळ सुरू असल्याबद्दल संताप आणि निराशाही त्यांनी ट्विट करत व्यक्त केलं.

एचडी देवेगौडा यां म्हणाले की, प्रत्येकाने सन्मान आणि सभ्यता राखली तरच लोकशाहीचे रक्षण होऊ शकते. राज्यसभेचे सदस्य यांनी ओरडणे, नाव पुकारणे आणि घोषणाबाजी करणे या कृत्यांबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. ज्यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या जवळपास संपूर्ण कामकाजात अडथळा निर्माण झाला.

ते म्हणाले की "मी प्रकृती अस्वास्थ्य असतानाही संसदेत हजर राहायला आलो, पण जे घडत आहे. त्यामुळे मी खूप निराश झालो आहे. माझ्या प्रदीर्घ अनुभवावरून मी म्हणतो की, ही नवी नीचांकी आहे. प्रत्येकाने सन्मान आणि सभ्यता राखली तरच लोकशाही वाचू शकते," असे गौडा म्हणाले.

Tags:    

Similar News