काँग्रेसमुळेच महाविकास आघाडी सरकार – अशोक चव्हाण

महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादीला इशारा दिला आहे.

Update: 2020-12-28 11:16 GMT

महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे. मुंबईचे नवनियुक्त अध्यक्ष भाई जगताप यांच्या पदग्रहण कार्यक्रमात ते बोलत होते. काँग्रेसमुळेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. काँग्रेसने तयारी दाखवली म्हणून हे सरकार स्थापन होऊ शकले असेही अशोक चव्हाण यांनी यावेळ सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेमधून काँग्रेस नेतृत्वावर टीका केली गेल्यानंतर काँग्रेसने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. तसंच निर्णय प्रक्रियेमध्ये काँग्रेसला विश्वासात घेतले जात नाही, अशीही तक्रार काँग्रेसच्या मंत्र्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर अशोत चव्हाण यांनी केलेले वक्तव्य हे शिवसेना आणि राष्ट्रवादीला इशारा आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Full View
Tags:    

Similar News