Sanjay Raut यांच्यावरील विशेषाधिकार भंग आता राज्यसभेच्या सभापतींकडे - नीलम गोऱ्हे

संजय राऊत यांनी विधिमंडळ चोर असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरून राम शिंदे यांनी विधानपरिषदेत विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली होती. त्यावर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी निर्णय दिला.

Update: 2023-03-25 08:45 GMT

संजय राऊत यांनी विधिमंडळ चोर असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरून राम शिंदे यांनी विधानपरिषदेत विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली होती. त्यावर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी निर्णय दिला.

संजय राऊत यांनी विधिमंडळ नाही चोरमंडळ असं वक्तव्य केलं होतं. त्याचे विधिमंडळात तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर भाजप आमदार राम शिंदे यांनी विशेषाधिकारभंगाची नोटीस दिली होती. त्यानंतर याप्रकरणी हक्कभंग समितीची स्थापना करण्यात आली. यावेळी संजय राऊत यांनी पत्राद्वारे खुलासा केला होता. त्यामध्ये मी राज्यसभा या वरिष्ठ सभागृहाचा सदस्य आहे. तसेच माझा हक्कभंग समितीवर आक्षेप असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते. मात्र संजय राऊत यांच्यावर आणलेल्या विशेषाधिकारभंगाचा अभ्यास केल्यानंतर असे दिसून आले की, संजय राऊत यांनी हक्कभंग समितीवर आक्षेप घेणे चुकीचे असल्याचे सांगत मला त्यांचा खुलासा योग्य वाटत नसल्याचे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

पुढे बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्यसभा आहे आणि संजय राऊत हे राज्यसभेचे सदस्य असल्याने हे प्रकरण राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती यांच्याकडे पाठविण्यात येत असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

Tags:    

Similar News