भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुनेच्या जीवाला धोका कोणापासून?

Update: 2021-09-08 07:33 GMT

 भाजप चे खासदार रामदास तडस यांच्या सुनेने तडस कुटूंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. रामदास तडस यांच्या सुनेने आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत होत असल्याचं सांगत आपल्या जीवाला धोका असल्याचं एका व्हिडीओमध्ये मध्ये म्हटलं आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्याकडे पूजा तडस यांच्या सुनेने मदत मागितली आहे. या व्हिडीओत तडस यांची सून रडत असल्याचे दिसत आहे. तडस कुटूंब आपल्याला मारहाण करत असल्याचा आरोप त्यांनी या व्हिडीओत केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी पूजा तडस यांच्या संरक्षणासाठी पोहोचल्या आहेत, अशी माहिती चाकणकर यांनी दिली आहे. तसंच रामदास तडस आणि कुटुंबीयांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी. अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे.

Full View

दरम्यान या सगळ्या प्रकरणावर खासदार तडस यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना माझा मुलगा आणि सूनबाई लग्नानंतर कुटुंबापासून वेगळे राहत आहेत. या सगळ्या प्रकरणात माझी काहीच भूमिका नाही. ही वैयक्तिक नवरा बायकोची भांडणं आहेत. यात राजकारण कुठून आलं, मला माहिती नाही, अशी प्रतिक्रिया खासदार रामदास तडस यांनी दिली आहे.

Tags:    

Similar News