एकनाथ खडसे होणार 'राष्ट्रवादी', सूत्रांची माहिती

Update: 2020-10-20 08:08 GMT

गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू होती. पण आता एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय ठरलेला आहे. येत्या दोन दिवसात म्हणजे गुरुवारी एकनाथ खडसे आपल्या मुलीसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत. त्या मात्र भाजपमध्येच राहणार असल्याचे देखील समजते आहे. दरम्यान एकनाथ खडसे यांनी भाजपशी संबंधित सर्व साहित्य हे रक्षा खडसे यांच्याकडे पाठवून दिल्याची माहिती देखील सूत्रांनी दिलेली आहे.

गुरुवारी एकनाथ खडसे त्यांची कन्या रोहिणी खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत., खडसे सध्या मुक्ताईनगरच्या फार्महाऊसमध्ये आहेत. उद्या मोजक्या कार्यकर्त्यांबरोबर मुंबईकडे निघणार आहेत. खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर ह्या सध्या जळगाव जिल्हाबँकेच्या चेअरमन आहेत. खडसेंच्या पत्नी मंदाताई खडसे ह्या जळगाव जिल्ह्या दूधसंघाच्या चेअरमन आहेत. दूध संघ आणि जिल्हा बँकेवर खडसे परिवाराची सत्ता आहे. एकनाथ खडसेंच्या सून भाजपच्या खासदार रक्षा खडसे मात्र भाजप मधेच राहणार आहेत. दरम्यान एकनाथ खडसे यांच्या घरात असलेले भाजपचे सर्व साहित्य रक्षा खडसेंकडे पाठवून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


Tags:    

Similar News