हिंदुत्वासाठी सत्ता हवी होती. वाघाचं कातडं पांघरलेली शेळी असते तसं यांनी हिंदुत्वाचं कातडं पांघरलं आहे. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. आम्ही हिंदुत्वापासून कदापी दूर जाऊ शकत नाही. आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्वाला सोडलेलं नाही.काळजीवाहू विरोधकांना मी भगव्याचं तेज दाखवणार. हे काळजीवाहू विरोधक एकेकाळी मित्र होते. आपण त्यांना पोसलं. २५ वर्षे आपली युतीत सडली. या मतावर मी ठाम आहे. याचं कारण राजकारण म्हणजे गजकरण असे बाळासाहेब म्हणाले. यांना राजकारणाचं गजकरण झालं आहे. ते राजकारण म्हणून ते आता काही खाजवत आहेत. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला एक दिशा दाखवली असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.