काका- पुतण्या, बहिण- भावाची प्रतिष्ठा पणाला
बीड जिल्ह्यातील बाजार समिती निवडणूकीचे आज मतदान पार पडले. यामध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे, संदीप क्षिरसागर आणि जयदत्त क्षिरसागर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.;
बीड जिल्ह्यातील बाजार समिती निवडणूकीचे आज मतदान पार पडले. यामध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे, संदीप क्षिरसागर आणि जयदत्त क्षिरसागर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
बीड जिल्ह्यातील बीड, केज, अंबाजोगाई, परळी, वडवणी आणि गेवराई या सहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालकांच्या १०८ जागांसाठी मतदान झाले. यामध्ये पंकजा मुडे, धनंजय मुंडे, संदीप क्षिरसागर आणि जयदत्त क्षिरसागर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
बाजार समित्यांची निवडणूक आगामी विधानसभा निवडणुकांची नांदी समजण्यात येत असल्याने या निवडणुकीत प्रस्थापित आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. मतदारांची पळवापळवी झाली. फोडाफोडीनंतर आता आज प्रत्यक्ष मतदान होत असल्याने उमेदवारांचा कस लागणार आहे. निवडणुकीसाठी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
गेवराई बाजार समितीच्या १८ जागांसाठी मतदान होणार असून, १०८ संस्थांचे १३२९, १३६ ग्रामपंचायतचे १०४१, व्यापारी, अडते संघाचे ३६६ व हमाल तोलारी संघाचे ४८ मतदार हक्क बजावणार आहेत. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित यांच्या पॅनलविरुद्ध भाजप आमदार लक्ष्मण पवार, शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित एकत्र आले आहेत.
वडवणी बाजार समितीच्या १८ जागांसाठी २५ संस्थांचे ३०८, ३५ ग्रामपंचायतींचे २८४, व्यापारी, अडते संघातून ८२ व हमाल तोलारी संघाचे ६४ मतदार हक्क बजावणार आहेत.येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके, जयसिंह सोळंके व केशवराव आंधळे हे खिंड लढवित आहेत. तर भाजपकडून राजा मुंडे, विनोद नहार आणि अॅड. राज पाटील यांच्या समर्थकांचे पॅनल मैदानात आहे.
अंबाजोगाईत महाविकास आघाडीविरुद्ध भाजप अंबाजोगाई बाजार समिती निवडणुकीत ३८०४ मतदार त्यांचा हक्क बजावणार आहेत. महाविकास आघाडीविरुद्ध भाजप असा सामना येथे पाहायला मिळणार आहे.
बीड बाजार समितीसाठी बीड येथे ७, मांजरसुंबा येथे ३ व पिंपळनेर येथे २ अशी मतदान केंद्रे केंद्रे आहेत. १८ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत १४२ संस्थांचे १७५५, १७५ ग्रामपंचायतींचे १४४७, व्यापार व अडते मतदारसंघाचे ३५६ व हमाल तोलारी संघाचे १५८, असे एकूण ३७१६ मतदार हक्क बजावणार आहेत. बीडमध्ये जयदत्त क्षिरसागर विरोधात सर्व पक्षीय महाआघाडीबीड बाजार समितीमध्ये ४० वर्षांपासून सत्ता ताब्यात असणारे जयदत्त क्षीरसागर यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना दोन्ही गट, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, साव मैदानात उतरले. रिपाइने मात्र सहभाग दर्शविला नाही, तर गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार क्षीरसागर यांच्या सोबत आहेत.
केजमध्ये भाजप, राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना
केज बाजार समितीच्या १८ जागांसाठी ८० संस्थांचे १००२ मतदार ११४ ग्रामपंचायतींचे ८१५, व्यापारी, अडते संघातील १२८. हमाल, तोलारी संघातून २६ मतदार हक्क बजावणार आहेत.येथे भाजप, राष्ट्रवादी एकत्र आले असून याविरोधात शिवसेना शिंदे गट मैदानात आहे.
परळी बाजार समितीच्या १८ जागांसाठी संस्था मतदारसंघातून ६४७ मतदार, ९० ग्रामपंचायतींचे ८६२ मतदार तसेच इतर मतदारसंघातील उमेदवार हक्क बजावणार आहेत. येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार धनंजय मुंडे व भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या लढत होत आहे.