इतिहासात नादिरशहाने दिल्ली जाळल्याची नोंद आहे. त्यामुळे आता नादिरशहानंतर अमित शहा यांचे नाव दिल्ली जळीत प्रकरणामध्ये निश्चितपणे नोंदले जाईल अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
दिल्ली जळत असताना पोलिसांनी हिंसा करणाऱ्यांवर कारवाई केली नाही. पोलिस ‘मूक दर्शक’ बनून राहिले. यामागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कारवाई न करण्याचा आदेश होता हे स्पष्ट दिसत आहे असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.