आम्हाला कोणताही राजकीय खेळ खेळायचा नाही, अजित पवार यांचं स्पष्ट वक्तव्य

Ajit pawar News : राष्ट्रवादी सोडून अजित पवार भाजपशी युती करणार अशी चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात रंगली आहे. त्यामध्ये अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली.;

Update: 2023-04-18 12:17 GMT

"माझ्याबद्दल आणि माझ्या सहकाऱ्यांबद्दलचे गैरसमज अनेक ठिकाणी पसरवले जात आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या म्हणण्यानुसार, या बातम्या ज्या माझ्याबद्दल येत आहेत, यात काही तथ्य नाही. विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) हे अनेकवेळा चर्चेचा विषय ठरले आहेत. या सगळ्या गुंतागुंतीबाबत अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला विचार स्पष्ट केला.

माझ्याबद्दलच्या अफवा चुकीच्या आहेत. कुठल्याही 40 आमदाराचे सही झालेली नाही. राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे आहोत आणि आम्ही येथेच राहणार आहे. मी विधानभवनात बसतो. येथे बसून काम करतो. मी पक्ष सोडणार नाही. काळजी करू नका. चुकीची माहिती वितरित करणे हे हेतु पुर्वक आहे. महत्त्वाच्या विषयांवर संशय निर्माण करण्यासाठी अशा अफवा पसरवल्या जात आहेत, असेही पवार म्हणाले.

"महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी आम्ही नागपूरला (Nagpur) गेलो होतो. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ज्या विमानात होते त्याच विमानाने मी परत आलो. नंतर नवी मुंबईत महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 12 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. त्यानंतर आम्ही नवी मुंबईतील रुग्णालयात सभासदांची भेट घेतली.

थोडक्यात, या कार्यक्रमामुळे अनावधानाने निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. दुपारी घेऊ शकला असता. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्यक्रमालाही सकाळी सहभागी होता आले असते. पण कार्यक्रम दुपारी घेण्यात आला. त्यात आम्हाला कोणताही राजकीय खेळ खेळायचा नाही, असेही पवार म्हणाले. मात्र ज्या निष्पापांचा बळी सरकारच्या चुकीमुळे गेला आहे. त्या निष्पापांना न्याय मिळावा, यासाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अजित पवार यांनी केली.

Tags:    

Similar News